भाजपला धक्का?, उत्तर कोल्हापुरात काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर

कोल्हापूर | पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरूये.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या या जागेवर ही निवडणूक झाली.

या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी दिली होती.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच जयश्री जाधव यांनी मोठी आघाडी घेतली असून विजयाच्या दिशेने कूच करत असल्याचं दिसत आहे.

बाविसाव्या फेरीत जयश्री जाधव 3529 मते तर सत्यजीत कदम यांना 3226 मते मिळाली.

या फेरीत सत्यजीत कदम यांना 210 मतांची आघाडी मिळाली आहे. बाविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15,525 मतांनी आघाडीवर आहेत. आता 23 हजार 705 मतांची मोजणी बाकी आहे.

सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून 26 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. सतेज पाटलांच्या कसबा बावड्यातून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हनुमान चालिसा पठणापूर्वी राज ठाकरेंना जोर का झटका! 

कोल्हापूर उत्तरचा निकाल पलटणार?, महत्त्वाची माहिती समोर 

“मी मुंबई, महाराष्ट्राची मुलगी, ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी…” 

Kolhapur Election Result 2022 | करुणा शर्मांचा भाजप अन् काँग्रेसवर गंभीर आरोप, केली ‘ही’ मागणी 

उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल; जयश्री जाधव आघाडीवर