भाजपला सर्वात मोठा झटका; जयश्री जाधवांचा दणदणीत विजय

कोल्हापूर | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर समोर आलाय. यात भाजपला सर्वात मोठा झटका बसलाय. काँग्रेसच्या जयश्री जाधवांचा दणदणीत विजय झाला आहे.

निवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव झाल्याने चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 4856 तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना 2719 मते मिळाली. सतेज पाटील यांच्या कसबा बावड्यातून काँग्रेसने ही आघाडी घेतली.

काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली.

भाजपने सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी दिली होती. ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांनीही प्रतिष्ठेची बनवली होती.

महाविकास आघाडी भक्कम असल्याचा पुरावा देण्यासाठी आघाडीच्या नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यामुळे ठाकरे सरकारचा हा विजय 2024 च्या निवडणुकांसाठी देखील महत्त्वाचा असणार आहे.

दरम्यान, जयश्री जाधव या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचं गेल्यावर्षी निधन झालं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला सर्वात मोठा झटका; जयश्री जाधवांचा दणदणीत विजय

हनुमान चालिसा पठणापूर्वी राज ठाकरेंना जोर का झटका! 

कोल्हापूर उत्तरचा निकाल पलटणार?, महत्त्वाची माहिती समोर 

“मी मुंबई, महाराष्ट्राची मुलगी, ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी…” 

Kolhapur Election Result 2022 | करुणा शर्मांचा भाजप अन् काँग्रेसवर गंभीर आरोप, केली ‘ही’ मागणी