काँग्रेस मंत्र्यांना ‘या’ 10 खात्यांची लाॅटरी; संभाव्य खातेवाटपाची यादी तयार

मुंबई | महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटून गेले आहेत. मात्र, खातेवाटपाचा मुहूर्त लागलेला नाही. काँग्रेसनं काही महत्वाच्या खात्यांची मागणी केल्यानं हे खातेवाटप रखडल्याची चर्चा आहे. अशातच काँग्रेसची खातेवाटपाची यादी तयार झाल्याचं समोर आलं आहे.

काँग्रेसचं संभाव्य खातेवाटप-

बाळासाहेब थोरात – महसूल, मदत आणि पुनर्वसन
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत – ऊर्जा
विजय वडेट्टीवार – बंदरे, मत्स्य व्यवसाय, ओबीसी
के. सी. पाडवी – आदिवासी विकास
यशोमती ठाकूर – महिला आणि बाल कल्याण
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण
सुनील केदार – दुग्ध विकास आणि पशु संवर्धन
वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण

कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्याकडे कोणतं खाते असेल हे कळू शकलेलं नाही. तर सतेज पाटील आणि डॉ. विश्वजीत कदम या राज्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या दोन मंत्र्यांना कोणती जबाबदारी मिळणार, हेही अद्याप निश्चित नाही.

दरम्यान, खातवाटप कधी होणार याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगवेगळी उत्तर आली. आज दुपारी होणार, उद्या सकाळी होणार, आज होणार, अशी अनेक उत्तर नेत्यांकडून ऐकून झाली आहेत. त्यामुळे खातेवाटप नक्की कधी होणार याबाबत गोंधळ आहे.

महत्वाच्या बातम्या-