“शिवाजी महाराजांचा अवमान करणारे सावरकर भाजपला मान्य आहेत का?”

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूस्त्रीदाक्षिण्य या सद्गुणाला राष्ट्रघातक, कुपात्री, व विकृत्ती असे संबोधून महाराजांचा अवमान करणारे सावरकर भाजपला मान्य आहेत का ?, असा सवाल करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसने काढलेल्या पुस्तकेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. यावर भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं असून भाजपचा समाचार घेतला आहे.

सावरकरांकडून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी व बाबासाहेब आंबडकर यांच्या झालेल्या अवमानाला काँग्रेस विसरू शकत नाही. सावरकरांबद्दल भाजपला आलेला कळवळा ही महाराष्ट्रात भाजपविरहित सरकार स्थापन झाल्याच्या पोटशूळातून आलेला आहे, अशी टीकाही सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसने प्रस्तुत केलेल्या मर्यादीत पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गोडसे यांच्यात समलैंगिक संबंध होते, असा आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-