कोल्हापूर | काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभेसाठी पोटनिवडणूक (Election result) पार पडली. या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी बाजी मारली आहे.
शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur Bypoll Result) भाजपने जोर लावला होता. महाविकास आघाडीवर भाजपकडून आरोप करण्यात येत होते.
पोटनिवडणूक निकालानंतर शिवसैनिकांनी ‘हिमालय की गोद मे’ असं नमूद करत चंद्रकांत पाटील यांचे पोस्टर झळकावले.
युवक काँग्रेसनेदेखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात पोस्टर झळकावले. चंद्रकांत पाटील हिमालयात फरार झाले असल्याचे पोस्टर युवक काँग्रेसने झळकावले.
दरम्यान, कोल्हापूरमधील ही पोटनिवडणूक जिंकू अथवा हिमालयात जाऊ , हे आव्हान असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत म्हटलं होतं. या वक्तव्याची काँग्रेसह शिवसेना आणि राष्ट्रवादीने देखील चंद्रकांत पाटलांना आठवण करून दिलीये.
चंद्रकांत दादा हिमालयात जायला निघाला की कळवा बरं का!#उत्तरकोल्हापूर #महाविकासआघाडी pic.twitter.com/eRS4rjP7tR
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 16, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
उत्तर कोल्हापूरात इतिहास घडणार, गेल्या 50 वर्षांत जे झालं नाही ते होणार!
भाजपला सर्वात मोठा झटका; जयश्री जाधवांचा दणदणीत विजय
भाजपला धक्का?, उत्तर कोल्हापुरात काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर
हनुमान चालिसा पठणापूर्वी राज ठाकरेंना जोर का झटका!
कोल्हापूर उत्तरचा निकाल पलटणार?, महत्त्वाची माहिती समोर