उत्तर कोल्हापूरात इतिहास घडणार, गेल्या 50 वर्षांत जे झालं नाही ते होणार!

कोल्हापूर | काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभेसाठी पोटनिवडणूक (Election result) पार पडली. या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी बाजी मारली आहे. भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

उत्तर कोल्हापूर मतदारसंघानं आतापर्यंत 9 आमदार पाहिले. पैकी दोन जण प्रत्येकी दोनदा निवडून आलेत.

कोल्हापूर उत्तरमधून एकदाही महिला उमेदवार विजय झाला नाही. त्यामुळे यंदा विधानसभेत पहिल्यांदाच उत्तर कोल्हापूरचं प्रतिनिधीत्व महिला करताना पाहायला मिळणार आहे.

या निवडणुकीत काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी दिली होती.

ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडी या दोघांनीही प्रतिष्ठेची बनवली होती. दोन्हीकडून दिग्गज नेत्यांनी कोल्हापुरात दाखल होत प्रचार केला होता.

या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत जवळपास 60 टक्के मतदान झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजपला सर्वात मोठा झटका; जयश्री जाधवांचा दणदणीत विजय

भाजपला धक्का?, उत्तर कोल्हापुरात काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर

हनुमान चालिसा पठणापूर्वी राज ठाकरेंना जोर का झटका! 

कोल्हापूर उत्तरचा निकाल पलटणार?, महत्त्वाची माहिती समोर 

“मी मुंबई, महाराष्ट्राची मुलगी, ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी…”