नारायण राणेंना दिलासा; न्यायालयाकडून महत्त्वाचा निर्णय जारी

धुळे | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

नारायण राणेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

नारायण राणेंसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. धुळे न्यायालयाने केंद्रीय मंत्री राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

धुळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आज धुळे जिल्हा व सत्र न्यायधीश आर.एच मोहंमद यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.

न्यायाधीशांनी आज दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “मुख्यमंत्र्यांमध्ये सत्तेचा अहंकार आला आहे”

  “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लिलावती रुग्णालयातील डाॅक्टरांना धमक्या”

  ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

  कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  “बाॅलिवूडला मी परवडणार नाही”; महेश बाबूचं वक्तव्य चर्चेत