पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत.

एकीकडे कडक उन्हाळा सुरु आहे तोच दुसरीकडे काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळत आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढले काही दिवस मुसळधार पाऊस होऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

या महिन्याच्या तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्येही 13 मे पर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्यानं आहे.

दरम्यान,येत्या काही दिवसांमध्ये किमान आणि कमाल तापमानात घट होणार आहे. मात्र, या काही दिवसांमध्ये नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

देशात निर्माण झालेल्या कोळसा टंचाईमुळे अनेक ठिकाणी काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना उष्णतेचा अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  नारायण राणेंना दिलासा; न्यायालयाकडून महत्त्वाचा निर्णय जारी

  “मुख्यमंत्र्यांमध्ये सत्तेचा अहंकार आला आहे”

  “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लिलावती रुग्णालयातील डाॅक्टरांना धमक्या”

  ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

  कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…