राज ठाकरेंबाबत भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

लखनऊ | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याच मुद्दा उपस्थित केल्यापासून देशभरात गदारोळ पहायला मिळत आहे.

भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज्यभर आणि देशभरही गोंधळ उडाला असून राज ठाकरेंवर हल्लाबोल केला जात आहे.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला आहे.

राज ठाकरेंनी माफी मागीतल्याशिवाय त्यांना अयोध्या दौऱ्यावर येऊ देणार नाही, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे वरुन आले तर हनुमानजी त्यांना वरतून उचलून घेतील, असं वादग्रस्त वक्तव्य बृजभूषण सिंह यांनी केलं आहे.

बृजभूषण सिंहच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मनसेसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा वाद वाढणार असल्याचं दिसत आहे.

राज ठाकरेंच्या दौऱ्याला केलेल्या या विरोधामुळे त्यांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात तर अडकणार असल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी! भारतीय बॅडमिंटन संघानं तब्बल 73 वर्षानंतर रचला इतिहास

  “कुणाच्याही वडिलांबद्दल त्यानं मरावं असं कोणी बोलतं का?”; सुप्रिया सुळे संतापल्या

  अभिनेत्री केतकी चितळेला ‘इतक्या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

  “बाळासाहेब ठाकरे असली होते मात्र उद्धव ठाकरे…”

  “सकाळी 8 वाजता शपथविधी झाला, त्याला पहाट म्हणतात का?”