मुंबई | राज्यात आणि देशभरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उष्णता वाढलेली आहे. वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भ उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहे त्यातच आता भारतीय हवामान विभागाने उष्णतेमध्ये तीव्र वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
विदर्भात असानी चक्रीवादळामुळे त्या भागात हवामानात गारवा असल्याने उष्णता कमी झाली होती परंतु कालपासून पुन्हा तापमान वाढू लागले आहे.
पुढचे चार दिवस विदर्भासह मराठवाडा या भागात उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलं आहे.
दरम्यान, देशात निर्माण झालेल्या कोळसा टंचाईमुळे अनेक ठिकाणी काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना उष्णतेचा अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
राज ठाकरेंबाबत भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…
मोठी बातमी! भारतीय बॅडमिंटन संघानं तब्बल 73 वर्षानंतर रचला इतिहास
“कुणाच्याही वडिलांबद्दल त्यानं मरावं असं कोणी बोलतं का?”; सुप्रिया सुळे संतापल्या
अभिनेत्री केतकी चितळेला ‘इतक्या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
“बाळासाहेब ठाकरे असली होते मात्र उद्धव ठाकरे…”