‘नाय वरनभात लोन्चा’ चित्रपटात आक्षेपार्ह दृश्य; महेश मांजरेकर म्हणतात…

मुंबई | मागील काही दिवसांपासून मराठी चित्रपटांचा ट्रेंड बदलताना दिसत आहे. परिवारिक आणि प्रेमकथेपेक्षा आता वास्तविक आणि वैचारिक चित्रपटांकडे मराठी दिग्दर्शकांचा कल झुकलेला पहायला मिळतो.

अनेक थक्क करणारे आणि प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवणारे सिनेमे अनेकदा पहायला मिळतात. मात्र, चित्रपटाच्या काही चित्रिकरणामुळे अनेकदा वाद झाल्याचं पहायला मिळतो.

अशातच अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा सिनेमा सध्या वादाच्या भौवऱ्यात सापडला आहे.

चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्यावर महिला आयोगाने आक्षेप घेतला होता. ही दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली होती.

राष्ट्रीय महिला आयोगाने रितसर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. त्यावर आता खुद्द महेश मांजरेकर यांनीच यासंदर्भात जाहीर निवेदन दिलं आहे.

ज्या दृश्यांवर महिला आयोगाने आक्षेप घेतला होता, ती दृश्य प्रदर्शित करण्यात आलेला ट्रेलर देखील काढून टाकण्यात आला आहे, असं मांजरेकर यांनी सांगितलं आहे.

हा चित्रपट 18 वर्ष वयोगटापुढील प्रेक्षकांसाठीच असल्याने सेन्सॉर बोर्डानेही याला A प्रमाणपत्र दिलं असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

या चित्रपटाच्या प्रोमोमधील काही दृश्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला, तरी कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नाही, असं स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या बातम्या –

कोणतंही सरकार आलं तरी विरोधात पोस्ट लिहिणारच, तो माझा हक्कच- किरण माने

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता 

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग