“कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने सर्दी-खोकला गायब होतो”

मुंबई | कोरोनापासून बचावासाठी लोक काढ्याचं सेवन करत आहेत. काही लोक तर असे विचित्र उपाय करत आहेत, ज्यामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कफ सिरपमध्ये शिजवलेलं चिकन.

बहुतेक लोक चिकन कफ सिरफ आणि दारूसोबत 30 मिनिटं शिजवत आहेत. टिकटॉकवर असे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड असलेला हा व्हिडीओ खूप शेअर केला जातो आहे.

असं चिकन खाल्ल्यानंतर चांगलीच झोप येते. चिकन खाल्ल्यानंतर उरलेलं सूप लोक सिरपासारखं पित आहेत. कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने सर्दी-खोकला गायब होतो, असा दावा केला जातो आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार वेलनेस हॅक म्हणून हा उपाय शेअर केला जातो आहे. फॅमिली मेडिसीन नावाच्या संस्थेचे डॉ. आरोन हार्टमन यांनी हा ट्रेंड खूप खतरनाक असल्याचं म्हटलं आहे. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, MIC.com ला दिलेल्या मुलाखतीत हार्टमन यांनी सांगितलं, जेव्हा तुम्ही कफ सिरपमध्ये पाणी, दारू टाकून चिकन शिजवाल तेव्हा मांसात ते खूप प्रमाणात असेल.

असं नीट शिजलेलं चिकन तुम्ही खाल्लं तर तुम्ही निम्मी बाटली कफ सिरफ प्यायल्यासारखं आहे. हे खूप धोकादायक आहे. यामुळे सर्दी-खोकला जाणार नाहीच पण तुमचं पोट नक्कीच खराब होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

पुण्यातील डॉक्टरने लेकीच्या लग्नाचा खर्च वाचवत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारलं घर! 

अभिनेत्री प्रियांका चोप्रा झाली आई; सरोगसीद्वारे घरी बाळाचं आगमन 

‘ही’ लक्षणं दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जा; Omicron ची 14 लक्षणं समोर 

“अजित पवार आम्हाला विश्वासात घेत नाहीत”; चंद्रकांत पाटलांचा आरोप