Corona Alert! गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ; वाचा आकडेवारी

मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसत आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्यानं आता आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. आज तब्बल 40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14,265 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

5 जानेवारी रोजी राज्यातील नवीन रूग्णसंख्या 26 हजार 538 होती आता नवी रुग्णसंख्या 40 हजारावर गेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची चिंता देखील वाढली आहे.

गेल्या 3 दिवसांमध्ये राज्यातील नवीन रूग्णसंख्या ही काही पटींनी वाढल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 20 हजार 971 नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे आता मुंबईत लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

“नाना पटोले यांच्यावर कारवाई करा, त्यांना…”, चंद्रकांत पाटलांची आक्रमक मागणी

नाचत नाचत आला अन् आमदाराला कानाखाली मारून गेला; व्हिडीओ तुफान व्हायरल

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात गेल्या 6 वर्षातील सर्वात मोठी वार्षिक घट

मराठवाडा, विदर्भात गारपीटीची शक्यता; राज्यातील ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी

भाजपच्या मदतीने काँग्रेस-राष्ट्रवादीला गड राखण्यात यश, पण…; या निकालाची राज्यभर चर्चा