‘या’ 5 पेनी स्टॉक्सने दिले जबरदस्त रिटर्न्स; फक्त 5 दिवसात गुंतवणूकदार मालामाल

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ओमिक्राॅन आणि कोरोनाचा थैमान वाढत असताना देखील शेअर बाजारात वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता गतवर्षीप्रमाणेच यंदाही गुंतवणूकदारांच्या नजरा वाढत्या शेअर्सवर असणार आहेत.

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता गेल्या पाच दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये काही पेनी स्टाॅक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

नववर्षाच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे 3 जानेवारी रोजी, Vegetable Products स्टॉकची किंमत 25 रूपयांवर होती. त्यानंतर एकामागून एक अपर सर्किट लागले.

अपर सर्किटमुळे 7 जानेवारी रोजी Vegetable Products च्या प्रति स्टॉकची किंमत 31.10 वर पोहोचली. म्हणजेच, स्टॉकने केवळ 5 ट्रेडिंग दिवसांत 21 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Gold Line International Finvest हा शेअर यावर्षी सतत अपर सर्किटमध्ये आहे. या पेनी स्टॉकची किंमत 1 रूपयांपेक्षा कमी आहे. वर्षाच्या सुरवातीला याची किंमत 0.54 पैशांवर होती. आता हा शेअर 0.63 पैशांवर पोहोचला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना 16.67 टक्क्यांच्या परतावा मिळाला आहे.

Visagar Financial Services Ltd या कंपनीच्या शेअरची किंमत 8.79 रुपये होती. त्यानंतर आता या शेअरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं.

Visagar Financial Services Ltd कंपनीच्या शेअरची किंमत आता 10.66 रुपये आहे. गुंतवणुकदारांना केवळ 5 ट्रेडिंग दिवसांत तब्बल 21.27 टक्के परतावा मिळालाय.

Indian Infotech and Software Ltd शेअरची किंमत 3 जानेवारी रोजी 8.85 रुपये होती. यानंतर आता 7 जानेवारीला शेअरचा भाव 10.74 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीमधून फक्त 5 दिवसाच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 21.36 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळाला आहे.

Sharp Investments Ltd या कंपनीच्या शेअरची किंमत 4 रूपयांच्या खाली होती. शेअरची किंमत अवघ्या 5 दिवसांत 4.75 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे.  म्हणजेच गुंतवणूकदारांना तब्बल 20.87 टक्क्यांपर्यंतचा परतावा मिळाला आहे.

दरम्यान, 25 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्टॉकला पेनी स्टॉक म्हणतात. हे स्टॉक खूप स्वस्त असतात आणि त्यांचे बाजार मूल्य कमी असतं.

महत्वाच्या बातम्या –

Corona Alert! गेल्या 24 तासात राज्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ; वाचा आकडेवारी

“नाना पटोले यांच्यावर कारवाई करा, त्यांना…”, चंद्रकांत पाटलांची आक्रमक मागणी

नाचत नाचत आला अन् आमदाराला कानाखाली मारून गेला; व्हिडीओ तुफान व्हायरल

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात गेल्या 6 वर्षातील सर्वात मोठी वार्षिक घट

मराठवाडा, विदर्भात गारपीटीची शक्यता; राज्यातील ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट जारी