‘कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसांत खाल्ला…’ प्रविण तरडेंची भावूक करणारी पोस्ट

मुंबई| देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. या लढाईत अनेक योद्ध्यांना कोरोनानं ग्रासलं देखील. तसेच अनेक डॉक्टर्स, नर्सेस यांनी या लढाईत आपले प्राण देखील गमावले आहेत.

दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

अशातच कोरोना अगदी काही दिवसांत होत्याचं नव्हतं करतो. याचा प्रत्यय अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या प्रवीण तरडे यांना आला आहे. प्रविण तरडेंनी आपल्या जीवाभावाचा मित्र गमावला आहे.

अभिनेता अमोल धावडे यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. निर्व्यसनी, दररोज व्यायाम करणाऱ्या अमोलचा कोरोनाने बळी घेतला आहे. अगदी 15 दिवसांत कोरोनाने माझ्या मित्राला खाल्ला, असं म्हणतं प्रविण तरडे यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

पोस्टमध्ये लिहल्याप्रमाणे अमोल यांचा वाढदिवस 11 मे ला असतो आणि त्याचदिवशी प्रत्येक सिनेमाचं डबिंग सुरु करण्यात यायचं. तसेच हे आपल्या श्रद्धेचा एक भाग असल्याचं तरडेंनी यामध्ये लिहिलं आहे. 1999 साली आपण पुरुषोत्तम जिंकला तेंव्हा अमोल यांनी कडकडून मारलेली मीठी कशी विसरू रे मित्रा? असा सवाल देखील तरडेंनी यामध्ये केला.

आपल्या मित्राच्या आठवणी लिहिताना आपण एकत्र नॅशनल खेळलो, एकांकीका केल्या, सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास, तुझा शेवटचा मेसेज होता, बाय बाय प्रविण बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव आणि राहिलाच शेवटी, असं त्यांनी म्हटलं आहे.

आपले अश्रू अनावर न झाल्याचं देखील प्रविण तरडेंनी त्यांच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डोळ्यातील पाणी थांबत नाही. ये रे आमल्या .. जिथे कुठे असशील सुखी राहा .. नाही तरी मी आणि पिट्या तुला ‘सुखी जीव’ असच म्हणायचो की .. सुखी राहा .. कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा, अशा शब्दात तरडेंनी आपल्या मृत मित्राला दिलासा दिला आहे.

दरम्यान, दुसऱ्या लाटेने राज्याला खूप मोठा फटका बसला आहे. या काळात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने अगदी आरोग्य यंत्रणेला देखील कोलमडून टाकले आहे.

https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/4131420866879157

महत्वाच्या बातम्या – 

जाणून घ्या! ऑस्कर जिंकणाऱ्याला किती रुपयांचं मानधन मिळतं

‘हा’ व्हिडीओ बघून तुमच्याही अंगाचा होईल थरकाप, त्यामुळे…

oscars 2021: ‘या’ चित्रपटानं 2021 सालातील तीन…

‘गावरान मुंडे’नंतर आता ‘हे’ Rap Song…

कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्यांची सलमान खान अशाप्रकारे…