धक्कादायक! मुंबईत सुरू आहे कोरोनावरील औषधांचा काळाबाजार

मुंबई | संपूर्ण जगालाच कोरोनाने विळखा घातला आहे. दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. मात्र, अश्यातच मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी लागणाऱ्या औषधं आणि इंजेक्शनांचा मुंबईत काळाबाजार सुरू आहे. काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांच्या सात जणांच्या टोळीला अन्न आणि औषध पुरवठा विभागानं छापा टाकून अटक केली आहे.

कोरोनावर उपचार करण्यासाठी लागणारे रेमडेसीविर इंजेक्शन ज्याची मुळ किंमत 5 हजार रुपये आहे. तेच इंजेक्शन तीस ते चाळीस हजार रुपयात विकत असल्याची माहिती अन्न व औषध पुरवठा विभागाला मिळाली. यावर, विभागानं मुलुंडमध्ये आपला खबरी पाठवून त्याची शहानिशा केली.

खात्री झाली असता विक्रेत्याला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान आणखी 7 जणांची नावे समोर आली. मुंबई पोलिसांनी या सात ॉही जणांना अटक केली आहे. हे विक्रेते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात.

आणखी मोठे मासे यामध्ये गळाला लागू शकतात, अशी शक्यता अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुनिल भारद्वाज यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तुम्हा सर्वांचे खूप आभार मानायचे आहेत पण… अमिताभ बच्चन झाले भावुक!

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी रियाबाबत नवा खुलासा; पोलिसांच्या हाती लागले ‘हे’ पुरावे

विजय मल्ल्याची सर्वोच्च न्यायालयात धाव; 13 हजार कोटी परतफेड करण्याची तयारी!

बापाचं संतापजनक कृत्य; बाळंतीण लेकीनं उचललं हे धक्कादायक पाऊल

महाविकास आघाडीतल्या ‘त्या’ वाद शिवसेनेकडून दिलगीरी; बाळासाहेबांचं स्पष्टीकरण