चिकन, मटन खाल्ल्याने कोरोना होत नाही- शरद पवार

मुंबई | चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते, अशी अफवा गेले काही दिवस सोशल मीडियावर फिरत आहे. या अफवेने पोल्ट्री व्यावसायिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

चिकन, मटन खाल्याने कोरोना होत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. चिकन, मटन खाल्याने कोरोनाची लागण होते या अफवेने नागरिकांनी मांसाहाराकडे पाठ फिरवली आहे.

या अफवेचा फटका सर्वात जास्त बसला तो पोल्ट्री व्यावसायिकांना. काही पोल्ट्री व्यावसायिकांनी आपलं पक्षी सेल लावत विकले तर काहींनी त्यांना जिवंतपणे खड्ड्यात गाडलं. त्यामुळे साहजिकच चिकनचे भाव सध्या उतरले आहेत.

दरम्यान, बिनधास्त चिकन मटन मासे खा… कोरोना होत नाही, अशी फेसबुक पोस्ट करत मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना या अफवेला बळी न पडण्याचं आवाहन केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-कौतुकास्पद.. आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतेय अन् आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची काळजी!

-महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला, आणखी 2 महिलांना कोरोनाची लागण

-मुंबई महापालिकेने दंड वाढवल्यावरही थुंकोबांकडून एका दिवसात तब्बल इतका दंड वसूल

-धक्कादायक! कोरोनामुळे इटलीत एका दिवसात 475 जणांचा मृत्यू

-कोरोनापासून वाचण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन