पुणे | राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे जवळपास चोवीस तास याच कामात व्यग्र आहेत. या कामातून ते काहीसा वेळ काढून ते मुंबईतील रूग्णालयात जात आहेत. कारण रूग्णालयात त्यांची आई जीवन-मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र दु:ख दूर ठेवून आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या आरोग्य मंत्र्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
20 दिवसांपासून माझी आई विविध व्याधींमुळे बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयूत मृत्यूशी झूंज देत आहे. मुलगा म्हणून मला आवश्यक ती काळजी घेता येत नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
अवघ्या काही मिनिटांचीच ती भेट असते. गेल्या काही दिवसांपासून हाच टोपे यांचा दिनक्रम बनला आहे. टोपे काल पुण्यात होते. पुण्यातील कोरोनाची स्थिती आणि वाढणारा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा राजेश टोपे यांनी घेतला.
बैठका, आढावा, आवश्यक उपाययोजना, माध्यमांना योग्य माहिती देण्याची जबाबदारी हा ताण रोजचा आहे. या साऱ्या चर्चेच्या ओघात त्यांनी आईच्या आजारपणाविषयी माहिती पुण्यातला आपल्या मित्राला सांगितली.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला, आणखी 2 महिलांना कोरोनाची लागण
-मुंबई महापालिकेने दंड वाढवल्यावरही थुंकोबांकडून एका दिवसात तब्बल इतका दंड वसूल
-धक्कादायक! कोरोनामुळे इटलीत एका दिवसात 475 जणांचा मृत्यू
-कोरोनापासून वाचण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन
-कोरोनामुळे पुण्यातील 584 पीएमपीएमएलच्या फेऱ्या बंद