उस्मानाबादमध्ये कोरोनाचा शिरकाव; मुंबईतील ताज हॉटेलमधून गावी आलेला वेटर पॉझिटिव्ह

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी उस्मानाबादमध्ये 2 रुग्ण सापडल्याची माहिती दिली आहे.

उस्मानाबादमध्ये आढळलेला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा लोहारा तालुक्यातील धानोरी गावाचा रहिवासी आहे. तो काही दिवसांपूर्वी मुंबई येथून आला होता.

उस्मानाबादेत सापडलेला दुसरा कोरोना रुग्ण हा मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचा. त्याची तपासणी केल्यानंतर रुग्णाला कोरोना झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आलं, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.

हा रुग्ण मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये कामाला असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यानंतर तो उस्मानाबादला आला.

महत्वाच्या बातम्या –

-“दिवे लावा असं सांगण्यापेक्षा मोदींनी लोकांना घरी एका जागी शांत बसण्याचं आवाहन करायला पाहिजे होतं”

-ना लोकांच्या वेदनेची ना लोकांची आर्थिक चिंता, मोदींची फक्त ‘शो’बाजी- शशी थरूर

-“कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असं सध्या तरी दिसत नाही”

-“लगा था चुल्हा जलाने की बात करेंगे लेकिन उन्होंने दिया जलाने को कहा”

-दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा हेतू असावा- रोहीत पवार