केंद्राने धान्य देताना कोणतीच अट ठेवली नाही मात्र राज्य सरकारने अटी ठेवल्या आहेत- फडणवीस

मुंबई |  आगामी 3 महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून देताना केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र राज्य सरकारने अनेक अटी टाकल्या आहेत. आधी विकत मिळणारे रेशन घेतले तरच पुढचे धान्य मोफत मिळेल, ज्यांनी नियमित धान्य घेतले, त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरूपाच्या या अटी आहेत. या अटी राज्य शासनाने मागे घ्यावात, अशी विनंती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आज गरिबांना धान्य मोफत मिळणे अतिशय आवश्यक आहे. रेशन कार्ड असो वा नसो, धान्य देण्याचेच निर्णय अन्य राज्यांनी सुद्धा घेतले आहेत, अशी आठवण फडणवीसांनी राज्य सरकारला करून दिली आहे.

केंद्रीय नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, 3 महिन्यांसाठी आवश्यक धान्यापैकी 90 टक्के कोटा उपलब्ध झाला आहे. उर्वरित 2 दिवसात उपलब्ध होईल. त्यामुळे 3 महिन्यांचे धान्य राज्य सरकारने एकत्र द्यावे, असाही सल्ला फडणवीसांनी राज्य सरकारला दिला आहे.

कोरोनाच्या कठीण काळात विरोधी पक्ष नक्कीच सत्ताधारी पक्षाबरोबर आहे. त्यांच्या साथीने आपल्याला सर्वांना कोरोनासारख्या महामारीचा सामना करायचा आहे. मला विशअवास आहे की लवकरच आपण या आजारावर मात करू, असं फडणवीस म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या –

-उस्मानाबादमध्ये कोरोनाचा शिरकाव; मुंबईतील ताज हॉटेलमधून गावी आलेला वेटर पॉझिटिव्ह

-“दिवे लावा असं सांगण्यापेक्षा मोदींनी लोकांना घरी एका जागी शांत बसण्याचं आवाहन करायला पाहिजे होतं”

-ना लोकांच्या वेदनेची ना लोकांची आर्थिक चिंता, मोदींची फक्त ‘शो’बाजी- शशी थरूर

-“कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असं सध्या तरी दिसत नाही”

-“लगा था चुल्हा जलाने की बात करेंगे लेकिन उन्होंने दिया जलाने को कहा”