राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दीडशे पार; आज एकाच दिवशी 28 रूग्णांची नोंद

मुंबई |  राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आज एकाच दिवशी 28 रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण कोोरनाबाधितांची संख्या आता 153 वर जाऊन पोहचली आहे.

नव्याने नोंद झालेल्या रूग्णांमध्ये सांगलीमधील बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या 15 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर नागपूरमधील बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत 2 रूग्ण सापडले आहेत. तर पुणे पालघर, गोंदिया, कोल्हापूर येथे 1 रूग्ण सापडला आहे.

राज्यातले कोरोना संशयित म्हणून विविध रूग्णालयात आज 250 जण भरती झाले आहेत. तर आज 24 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, पुण्यातून दिलासादायक चित्र आहे. गेल्या दोन दिवसांत रूग्णांची संख्या घटली आहे. तर रूग्णही बरे होऊन घरी जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

-बारामतीच्या काटेवाडीत युवकांनी खाकी वर्दीवरच टाकला हात, ‘या’ कारणामुळे स्टम्पनं मारलं

-पहिला देश, बाकी सारं नंतर; रोहित शर्माचं अभिमान वाटावं असं उत्तर

-‘बाहुबली’चा देशासाठी मदतीचा हात; 4 कोटींची केली मदत

-कोरोनाच्या संकटात देव धावले मदतीला, साईबाबा आणि अंबाबाई मंदिराची सरकारला भरघोस मदत

-सध्या पोलिस यंत्रणेवर खूप ताण पडतोय… मला सुरक्षा नको- चंद्रकांत पाटील