सावधान… कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली 97 वर; नागरिकांनो आता तरी घराबाहेर पडू नका

मुंबई  | राज्यातील जनतेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक बातमी आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तो काही कमी होण्याचा नाव घेताना दिसत नाहीये. आज काही तासांत कोरानाबाधितांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आता हा आकडा 97 वर पोहचला आहे.

साताऱ्यामध्ये 1 कोरोनाग्रस्त, सांगलीमध्ये कोरोनाचे  4 रूग्ण तर मुंबईत 3 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन वारंवार करत आहे.

कोरोना व्हायरस आता गुणाकारच्या पटीने वाढत जाईल, अशी भिती मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी रविवारीच व्यक्त केली होती. अन् आजच्या दिवशी ही संख्या तब्बल 10 रूग्णांनी वाढली आहे.

दरम्यान, ज्यांना कोरोणाची लक्षणे आढळायला सरू होतील, त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचं आवाहन शासनाकडून केलं गेलं आहे. गर्दी टाळण्यासाठी आज शासनाने संपूर्ण राज्यात कर्फ्यू लागू केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“आता रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गय करणार नाही… सगळं तुमच्यासाठीच चाललंय एवढंही कळू नये”

-“आत्ताच्या परिस्थितीत घरी राहणं हेच देशासाठी मोठं योगदान”

-जिथून कोरोनाची सुरुवात झाली तिथून आली आनंदाची बातमी

“मला पोलीस सुरक्षा नको, आत्ताच्या घडीला महाराष्ट्राला त्यांची जास्त गरज आहे”

-कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावं म्हणून शरद पवारांनी दिला हा संदेश