‘नवीन वर्षात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होईल’; आरोग्य सचिवांचा धक्कादायक खुलासा

मुंबई | ओमिक्रॉन व्हेरियंटने(Omicron variant) संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. त्यातचं पुन्हा एकदा डेल्टा  व्हेरियंट(Delta variant) देशासाठी डोकेदुखी ठरत आहे. राज्यात डेल्टा व्हेरियंटच्या रूग्णसंख्येत अधिक वाढ होत आहे. त्यातच आता  महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांनी एक पत्र लिहून जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सतर्क करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास (Maharashtra Health Secretary Pradip Vyas)यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. सदर पत्रामध्ये जानेवारी महिन्यात कोरोना रूग्ण दोन लाखांच्या वर जातील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

डेल्टा व्हेरियंटमुळे देशभरात दुसरी लाट  आली होती. आता 70 टक्के रूग्णांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंता वाढली आहे. आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला धोका असल्याचं म्हटलं आहे.

राज्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आरोग्य सचिवांनी लिहिलेल्या पत्रामध्ये ओमिक्रॉन बाबतही सतर्क केलं आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका नाही. ओमिक्रॉन सौम्य आहे, असा गैरसमज करून घेऊ नका असंही म्हटलं आहे.

तसेच लसीकरण(Vaccination) न झालेल्या आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांसाठी ओमिक्रॉन जीवघेणा ठरू शकतो. यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका अधिक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये रूग्णवाढीचा वेग पाहायला मिळत आहे. याकारणामुळेच महाराष्ट्रात खबरदारी घेतली पाहिजे, असं राजेश टोपे (Minister Rajesh Tope) यांनी सांगितलं होतं. गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केले होते.

राज्यात तिसरी लाट आलीचं तर कोरोनाचीचं असेल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. राज्य सरकारकडून देखील 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून निर्बंध लावण्यात आले होते. त्यातच आता जानेवारी महिन्यामध्ये कोरोना रूग्णसंख्या दोन लाखांच्या वर जाण्याचा अंदाज असल्यामुळे राज्य सरकाच्या चिंतेत भर पडली आहे. सरकारकडून खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट

WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…

“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”

“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”

‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती