“एकनाथ शिंदे यांच्यासारखा नेता राज्य चालवू शकतो पण उद्धव ठाकरे…”

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यानं ते काही दिवस झालं आजारी आहेत. परिणामी राज्याच्या राजकारणात जोरदार शाब्दिक वाद रंगला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मानेवरील आजारावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तेव्हापासून ठाकरे हे आपल्या घरीच आहेत. परिणामी भाजपकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

राज्य हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून भाजपनं सरकारला घेरण्याचं काम केलं होतं. आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे हे सध्या आजारी आहेत त्यांना बरे होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तेव्हा विनाप्रमुखाचं राज्य कसं चालेल?, असा सवाल दानवे यांनी केला आहे.

राज्यात एकनाथ शिंदेसारखा माणूस आहे तो योग्यपणे राज्य चालवू शकतो. पण त्यांच्याकडं जबाबदारी देण्यात आली नाही, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मातब्बर नेते आहेत. मोठ्या प्रमाणात प्रशासन चालवण्याचा त्यांना अनुभव आहे. पण उद्धव ठाकरे त्यांच्याकडं जबाबदारी देत नाहीत, अशी टीका दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत त्यांनी लवकर बरे व्हावं ही माझी आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांनी लवकरात लवकर बरे होवून राज्यातील 12 कोटी नागरिकांची सेवा करावी, असंही दानवे म्हणाले आहेत.

ठाकरे यांची तब्येत सुधारण्यासाठी काही दिवस लागणार असतील तर त्यांनी एखाद्याला राज्याला प्रमुख बनवायला हवं, असं दानवे म्हणाले आहेत. भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर जोरदार टीका होत आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत राज्याती धुरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर द्या किंवा दुसऱ्या एखाद्या नेत्याा प्रमुख बनवा असंही दानवे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

 नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट

WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…

“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”

“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”

‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती