गुजरातमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली; महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातचा नंबर

अहमदाबाद |  संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असताना देखील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. कोरोनाने महाराष्ट्रात सर्वाधिक कहर केला आहे. त्या पाठोपाठ आता गुजरातचा क्रमांक लागला आहे.

गुजरात राज्यामध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली आहे. बुधवारपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत गुजरातमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे गुजरातची कोरोनाबाधितांची संख्या आता 2407 वर जाऊन पोहचली आहे.

महाराष्ट्रात 5649 एवढे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तर आता गुजरातची एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2407 झाल्याने देशात महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातचा क्रमांक लागला आहे.

बुधवारी देशात एकूण 1273 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले. त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण हे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आढळले आहेत. यावरूनच अंदाज येतो आहे की या दोन राज्यांमध्ये कोरोना किती वेगाने फैलावतो आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यात रुग्ण दुपटीचा दर 7 दिवसांवर गेलेला आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहीती

-…तर चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचं कशाला?; सामनाच्या अग्रलेखातून सवाल

-“हे संकट देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे, या संकटात राजकारण करणं गैर”

-‘या’ दोन्ही लढाईतही आपणच जिंकू – नितीन गडकरी

-फेसबुकसोबत करार होताच जिओनं केला हा कारनामा!