धक्कादायक! मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह महिलेची हॉस्पिटलमध्येच आत्महत्या

मुंबई | कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका 29 वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते.

15 एप्रिलच्या मध्यरात्री या महिलेने रुग्णालयाच्या बाथरुममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची आग्रीपाडा पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे.

आत्महत्या केलेली महिला वरळीची रहिवासी होती. नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 25 मध्ये तिच्यावर उपचार करण्यात येत होते. कोरोनाची लागण होण्यापूर्वी या महिलेला दम्याचा आजार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नसून याविषयी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीसांनी दिली.

कोरोना बद्दल लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे.कारण त्याबद्दल त्यांनी खुप अफवाही ऐकलेल्या असतात अशातच मनाचा समतोल ठासळने साहजीकच आहे,पण कोरोनाचा सामना करुन कीतीतरी रुग्ण बरं झाल्याचीही उदाहरण आपल्या समोर आहेत. अशातच लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे असे सरकार तर्फे वारंवार सांगितल जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

-भारत-पाक क्रिकेट मालिका होणे शक्य नाही – सुनिल गावसकर

-“जागे व्हा आणि कामाला लागा अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल”

-“राज्यावरच्या अर्थसंकटाचे परिणाम दीर्घकाळ जाणवतील”

-पुण्यातल्या रेडिओलॉजिस्टला कोरोना; 144 गर्भवती महिला क्वारन्टाईन

-ट्रेनबाबतची अफवा पसरवणाऱ्याची चौकशी होणार- अनिल देशमुख