गुड न्यूज! देशात पहिल्यांदा अक्टिव्ह केसेस पेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

नवी दिल्ली | कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या सध्याच्या अ‌ॅक्टिव्ह केसेसपेक्षा जास्त झाली आहे.

देशभरातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट 50 टक्क्यांहून अधिक झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती देत आकडेवारी जारी केली आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 583 झाली आहे. यामध्ये 1 लाख 33 हजार 632 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर एकूण 7745 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एकूण 1 लाख 35 हजार 205 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसच्या जवळपास 10 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात एकूण 279 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या संकटात बँकांकडून मदतीचा हात; कमी व्याजात असं मिळवा पर्सनल लोन

-‘…पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं’; अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन पवारांचा कोश्यारींना टोला

-निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत करा- शरद पवार

-…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल- उद्धव ठाकरे

-कोरोनाच्या संकटकाळात उद्धव ठाकरेंच्या जागी कोणी दुसरं असतं तर…- जितेंद्र जोशी