मुंबई | एखादा मुद्दा विरोधी पक्षाने चांगल्याकरता मांडला तर त्याचा विचार करुन सरकारने कारवाई केली पाहिजे. दुर्देवाने तसं न झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. स्थलांतरित मजुरांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरून फडणवीसांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली.
आमच्यावतीने जे मुद्दे उचलले जात होते त्यावर राज्य सरकार म्हणत होतं की, तुम्ही विरोधाला विरोध करत आहात. तुम्ही महाराष्ट्रविरोधी आहात. मग आता महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का?, असा सवाल फडणवीसांनी केलाय.
स्थलांतरित मजुरांची कुठेही नोंद नाही. त्यांची व्यवस्था झाली नाही. त्यांना जेवण मिळालं नाही. त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था सरकारने उभी केली नाही, असं सगळं सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये आलं आहे, असं सांगत फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गुड न्यूज! देशात पहिल्यांदा अक्टिव्ह केसेस पेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त
-कोरोनाच्या संकटात बँकांकडून मदतीचा हात; कमी व्याजात असं मिळवा पर्सनल लोन
-‘…पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं’; अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन पवारांचा कोश्यारींना टोला
-निसर्ग वादळामुळे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत करा- शरद पवार
-…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल- उद्धव ठाकरे