कोरोना व्हायरसचा दीपिकालाही तडाखा

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावत आहे. आपल्यावर असणारी प्रत्येक जबाबदारी पार पाडणाऱ्या या अभिनेत्रीने आता मात्र कोरोना व्हायरसचा जगभरात वाढता संसर्ग पाहता एक मोठा निर्णय घेतल्याचं कळत आहे.

कोरोनाचा फटका एका अर्थी दीपिकालाही बसला आहे. कारण, अतिशय मानाच्या अशा समजल्या जाणाऱ्या पॅरिस फॅशन वीकमध्ये न जाण्याच निर्णय तिने घेतला. लूई वीटॉन या ब्रँडशी जोडली गेली असल्यामुळे दीपिकाला या कार्यक्रमाचं बोलावणं आलं होतं. तेथे न जाण्याचा निर्णय तिने घेतला.

दीपिकाच्या प्रवक्त्यांकडून याविषयीचं पत्रकही जारी करण्यात आलं. ज्यामध्ये याची विस्तृत माहिती देण्यात आली. Louis Vuitton`s FW2020 या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी दीपिका फ्रान्सला जाणार होती. पण, कोरोना व्हायरसची लाट ही आता फ्रान्सपर्यंत पोहोचल्याचंही म्हटलं गेलं. त्यामुळे तिने तिथे न जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं या पत्रकात म्हटलं गेलं.

सुरुवातीला चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग आता जगातील इतरही देशांमध्ये पसरू लागला आहे. अनेक देशांमध्ये नागरिकांना याचा संसर्गही झाला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी तरूणी झाली प्रियकरासोबत पसार!

-भाजपच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांना बनवलं थेट पंतप्रधान, अन् सभागृहात पिकला हशा

तारक मेहताच मराठीचे ‘मारक’ मेहता; मनसेचं टीकास्र

-सोडून काँग्रेसचा हात, हार्दिक पटेल देणार का केजरीवालांना साथ?

-ज्यांना शक्य आहे, त्यांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी या; देवदर्शनात राजकारण करू नका- उद्धव ठाकरे