कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यावर राज्यात पहिला गुन्हा दाखल

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण आढळला अशी खोटी बातमी तयार करून ती समाजमाध्यमावर पसरवणाऱ्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिला गुन्हा आहे.

विषाणूसंदर्भात सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांच्या सायबर सेलचं लक्ष आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

सोशल मीडियावरून ‘करोना’शी निगडित मोठ्या प्रमाणावर अफवा पसरविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, ‘करोना’बाबतचे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची बाब समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी अशा अफवा पसरविणाऱ्यांवर आपले लक्ष केंद्रित केलं आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर सायबर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर पुणे पोलीस करणार ‘ही’ कडक कारवाई

-“कोरोनाचं नाव पुढं करून राज्य प्रशासन लोकांना घाबरवत”

-“उलट्या वरातीत नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी ‘हे’ लक्षात ठेवलेलं बरं”

-कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा विश्वास

-सरकारने मास्क आणि हॅन्ड वॉश रेशन दुकानातून द्यावेत; चंद्रकांत पाटलांची मागणी