कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर पुणे पोलीस करणार ‘ही’ कडक कारवाई

पुणे | कोरोना विषाणूबाबत सोशल मीडियावर अफवा पसवणाऱ्या पुणे पोलिसांच्या सायबर सेलचे लक्ष आहे. अफवा पसवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सायबर सेलचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

सोशल मीडियावर कोरोनाशी संबंधित निगडित मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जात असल्याचं मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

नागरिकांनी खात्री न करता कोणतीही पोस्ट फॉर्वर्ड करु नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन पुणे पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. व्हॉट्सअ‌ॅपवर कोरोनाबाबत अफवा पसरवल्या जात असून मेसेज फॉर्वर्ज केले जात असल्याचं लक्षात आल्यावर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने अफवा पसरवणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांच्या विशेष शाखेंतर्गत सोशल मीडिया लॅब काम करत आहे. या लॅबमार्फत अफवांचे मेसेज आढळून आल्यास ते तात्काळ डीलीट केले जात आहेत. याबाबत पुणे पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“कोरोनाचं नाव पुढं करून राज्य प्रशासन लोकांना घाबरवत”

-“उलट्या वरातीत नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी ‘हे’ लक्षात ठेवलेलं बरं”

-कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा विश्वास

-सरकारने मास्क आणि हॅन्ड वॉश रेशन दुकानातून द्यावेत; चंद्रकांत पाटलांची मागणी

-…तर बाबरीनंतर दंगली उसळल्या नसत्या; शरद पवारांचं मोठं वक्तव्य