कोरोनाचा आयपीएलवर परिणाम??; बीसीसीआयने दिली पहिल्यांदाच माहिती

मुंबई |  कोरोना व्हायरसने जगभरात हातपाय सपरायला सुरूवात केली आहे. कोरोनाचे भारतात देखील 28 रूग्ण सापडले असल्याची माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. यातच दुसरीकडे आयपीएलचा सिझन देखील काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. जगभरातल्या अनेक खेळांना कोरोनाचा फटका बसला आहे. यातच आयपीएलला देखील फटका बसणार का? याची चिंता सध्या क्रिकेट रसिकांना पडली आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. पहिलाच सामना मुंबईत होत असून इतर सामने चेन्नई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद अशा शहरांमध्येही होणार आहे. कोरोनामुळं आयपीएल स्पर्धा रद्द होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला असताना बीसीसीआयनं याबाबत पहिल्यांदाच माहिती दिली आहे.

मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बीसीसीआयचे अधिकारी ब्रिजेश यांना आयपीएलला कोरोना विषाणूचा धोका आहे का? असे विचारले असता त्यांनी, आतापर्यंत कोणताही धोका नाही आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवतो, असं सांगितलं आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका निवेदनात म्हटले आहे की भारतात अद्याप याचा धोका नाही आहे. तर, बोर्डाच्या आणखी एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या वेळापत्रकानुसार भारतात येणार आहे. विशेष म्हणजे इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट श्रीलंकेत कसोटी मालिका खेळण्यापूर्वी म्हणाला होता की तो कोणत्याही खेळाडूशी हातमिळवणी करणार नाही, कारण हातमिळवणी करून कोरोना विषाणूचा प्रसार देखील होतो.

महत्त्वाच्या बातम्या-

-ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि दिशाभूल; फडणवीसांची टीका

-कोरोना व्हायरस जगाला ‘या’ 4 गोष्टी शिकवणार; आनंद महिंद्रा यांचं ट्वीट

-कोरोना नष्ट करण्यासाठी ‘जय श्री रामा’चा जयघोष करा; महंत परमहंस यांचा अजब दावा

-मनात सतत शारिरीक संबंधाचे विचार येणं ही समस्या?

-हे सरकार नक्की चालवतंय कोण?? मुस्लिम आरक्षणावरून भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल