ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि दिशाभूल; फडणवीसांची टीका

मुंबई |  उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक आणि दिशाभूल केलीये, अशी जोरदार टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते विधानभवनात पत्रकारांशी बोलत होते.

ठाकरे सरकारकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप फडणवीसांनी सरकारवर केला आहे.

100 दिवसात ते एकमेकांना समजू शकले नाही. 100 दिवसात त्यांनी आधी एकमेकांशी संवाद साधायला हवा असा टोला देखील त्यांनी लगावला. सरकारचा आम्ही निषेध करत आहोत, सरकार शेतकर्यांबाबत उदासीन आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी सांगितली मात्र झाली नाही, असंही फडणवीस म्हणाले.

दुसरीकडे महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू आहे मात्र कायदा केला जात नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन कर्जमाफी केली जात आहे. ही फसवी कर्जमाफी असल्याची टीका फडणवीसांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोरोना व्हायरस जगाला ‘या’ 4 गोष्टी शिकवणार; आनंद महिंद्रा यांचं ट्वीट

-कोरोना नष्ट करण्यासाठी ‘जय श्री रामा’चा जयघोष करा; महंत परमहंस यांचा अजब दावा

-मनात सतत शारिरीक संबंधाचे विचार येणं ही समस्या?

-हे सरकार नक्की चालवतंय कोण?? मुस्लिम आरक्षणावरून भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

-“कोण अमृता फडणवीस? त्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”