मुंबईतली कोरोना स्थिती कधी नियंत्रणात येईल?, महापालिका आयुक्तांनी सांगिती तारीख!

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतेय. त्यात मुंबईमध्येही रूग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईतील ही वाढती संख्या कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘मिशन झिरो’ राबवण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता 36 दिवसांवर पोहोचला असून वरळी, धारावी, देवनार, गोवंडी, बैंगनवाडी यासारख्या हॉटस्पॉटमधील स्थिती नियंत्रणात आली आहे. खाटा, रुग्णवाहिका, डॉक्टर,उपचार केंद्र या सर्व सुविधांमध्ये कित्येक पटीने वाढ झाली आहे.

पालिकेच्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, जनता यांचे सहकार्य लाभत आहे. याच वेगाने करोना विरुद्ध लढत राहिलो तर जुलै मध्यापर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली असेल, त्याच दिशेने प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे, असा विश्वास मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी व्यक्त केला आहे.

पहिल्यांदा मुंबईतील एकूण सहा विभागांमध्ये हे ‘मिशन झिरो’ राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये भांडुप, मुलुंड, बोरिवली, दहिसर, मालाड, कांदिवली या विभागांचा समावेश करण्यात आला आहे.

‘मिशन झिरो’ अंतर्गत दोन-तीन आठवड्यात रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. त्यानंतर या रूग्णांवरील उपचारांसाठी 50 फिरत्या दवाखान्यांची व्यवस्था करण्यात आहे. मुंबई पालिकेच्या ‘मिशन झिरो’या संकल्पनेमुळे वाढत्याकोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-संजय राऊतांनी शिवसेनेचे सोडून काँग्रेसचे प्रवक्तेपद स्वीकारले का?; विखे-पाटलांचा पलटवार

-अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा; मराठा ठोक क्रांती मोर्चाची मागणी

-चीनी कंपन्यांसोबतचे करार ठाकरे सरकारने रद्द केले नाहीत तर….; सरकारकडून स्पष्टीकरण

-…तर कोणतीही शिक्षा भोगेन; हसन मुश्रीफांचं चंद्रकांतदादांना खुलं आव्हान

-“भारतीय सैनिकांचं रक्त सांडताच शिवरायांच्या महाराष्ट्राने चीन्यांसोबतचे करार रद्द केले तसं….?”