सावधान: कोरोनाची माहिती व्हाॅट्सअ‌ॅपवर शेअर केली तर होऊ शकते कारवाई

पुणे | कोरोनाबाबत माहिती  सोशल मीडियावर शेअर करत असाल तर ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. सोशल मीडियावर सायबर सेल लक्ष ठेवून आहे. कोणीही अफवा पसरवत असल्याचं निदर्शनास आलं तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. आपत्ती काळात प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. नावं उघड झाल्यास विनाकारण अशा रुग्णांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो, असं मत डॉ. म्हैसेकरांनी व्यक्त केलं आहे.

नागरिकांनी सामाजिक भान ठेवणं आवश्यक आहे. कोरोना संशयित किंवा रुग्णांची नावे उघड करता कामा नयेत, असं आम्ही पहिल्या दिवसापासून आवाहन करत आहोत. पण सोशल मीडियातून कोणीतरी चुकीची माहिती प्रसारित करुन समाजामध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे, असंही म्हैसेकरांनी सांगितलं.

दरम्यान, पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबाला काळजीसोबतच मनस्तापालाही सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर सर्दी तापाच्या रोगाप्रमाणे तुम्ही कोरोनातून बरे होऊ शकता!

-कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर पुणे पोलीस करणार ‘ही’ कडक कारवाई

-“कोरोनाचं नाव पुढं करून राज्य प्रशासन लोकांना घाबरवत”

-“उलट्या वरातीत नाचणाऱ्या भाजपच्या ‘वऱ्हाडी’ मंडळींनी ‘हे’ लक्षात ठेवलेलं बरं”

-कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा विश्वास