कोरोना रुग्ण दारू पिऊन फिरत होता काॅलनीत; त्यानंतर रुग्णाचा घेतला चांगलाच समाचार, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली|  देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा तुटवडा सध्या भासतोय. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दारूच्या नशेत असलेले कोरोना रुग्ण धिंगाणा घालताना दिसत आहे.

दारूच्या नशेत कोरोना रुग्ण कॉलनीत पोहोचला. त्यामुळे काॅलनीत गोंधळ उडाला. त्यांनंतर रुग्णाच्या बायकोनं आणि काही आरोग्य अधिकाऱ्यांनी मिळून या कोरोना रुग्णाला उचलून रुग्णालयात हलवलं.

मात्र भरपूर दारू प्यायलेल्या या रुग्णाला क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यास विरोध करण्यात आला. त्यानंतर या कोरोना रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आलं.

हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत असून भरपूर कमेंट्स देखील या व्हिडीओवर पहायला मिळत आहे.

दरम्यान, मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

‘औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’,…

6 महिन्यांच्या बाळासह 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत कुटुंबातील…

जाणून घ्या! शरिरातील ऑक्सिजन पातळी वाढवायची असेल तर करा…

‘कर्ज हवं असेल तर आधी शरिरसुख दे’ सोसायटीच्या…

‘हा’ व्हिडीओ हलक्या काळजाच्या लोकांनी पाहू नका,…