‘तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा’; देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई | कोरोनामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

रेशनकार्ड उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांनाही धान्य द्या, ‘कोरोना’ विरोधात प्रत्यक्ष लढणाऱ्या डॉक्टर आणि नर्ससाठी महत्त्वाची साधनसामग्री तात्काळ उपलब्ध करा आणि तबलिगी संदर्भात कोणताही धार्मिक अभिनिवेश न बाळगता कारवाई करा, अशा तीन मागण्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुम्ही स्वत: लक्ष घालावं अशी विनंतीही केली आहे. महत्त्वाचं म्हणजे पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा असल्याचंही म्हटलं आहे.

आपण घेत असलेल्या सर्व निर्णयांना भाजप म्हणून आमचा पाठिंबा आणि सहकार्य आहेत. पण या महत्त्वाच्या बाबतीच हस्तक्षेप करुन जनहिताच्या दृष्टीने आपण त्वरेने निर्णय घ्याल अशी आशा बाळगतो, असं फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या कामाला माझ्या आणि महाराष्ट्राच्यावतीनं मानाचा मुजरा- आरोग्यमंत्री

-कोरोना इफेक्ट: एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

-ट्रम्प यांची भारताला धमकी; राहुल गांधींचं सणसणीत प्रत्युत्तर

-“हे आम्हाला हौस म्हणून नाही तर तुमचा जीव वाचवण्यासाठी करतोय”

-आपल्याला- हनुमानासारखी पर्वत उचलायची नाहीत, जयंतीला घरीच थांबा- अजित पवार