सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या कामाला माझ्या आणि महाराष्ट्राच्यावतीनं मानाचा मुजरा- आरोग्यमंत्री

मुंबई | आज जागतिक आरोग्यदिन आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने ‘सपोर्ट नर्सेस आणि मिडवाईव्हज’ ही संकल्पना ठेवली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी ज्याप्रमाणे काम करत आहेत त्यांच्या कामाला माझ्या आणि महाराष्ट्राच्यावतीनं मानाचा मुजरा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

यंदा जागतिक आरोग्य दिनाला कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने हे संकट टळावे, सर्वजण निरोगी व सुदृढ राहावेत ही सदिच्छा व्यक्त करत टोपेंनी सर्व वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्यांना कोरोनाविरूद्धच्या लढाईत दिवसरात्र लढण्यासाठी प्रोत्साहन देत जागतिक आरोग्यदिनाच्या शुभेच्या दिल्या.

कोरानाबाधित रूग्णांवर उपचार कण्यासाठी सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी कोरोना व्हायरसला न घाबरता मोठ्या धैर्यानं ते काम करत आहेत. सर्वजण एका शुर सैनिकासारखी कोरोनाच्या लढाईविरूद्ध लढत आहेत, असं टोपेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपण सर्वांना माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी स्वयंशिस्त पाळायला हवी. आपल्याला 15 एप्रिलला लॉकडाऊन थांबवायचा आहे त्याचप्रमाणे आपलं जे ब्रीद आहे, मीच माझा रक्षक, वागायला हवं, असंही टाेपेंनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना इफेक्ट: एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

-ट्रम्प यांची भारताला धमकी; राहुल गांधींचं सणसणीत प्रत्युत्तर

-“हे आम्हाला हौस म्हणून नाही तर तुमचा जीव वाचवण्यासाठी करतोय”

-आपल्याला- हनुमानासारखी पर्वत उचलायची नाहीत, जयंतीला घरीच थांबा- अजित पवार

-लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा चालू होणार का?; सरकारचा मसुदा तयार