‘…तर हत्येचा गुन्हा दाखल करणार’; तबलिगीच्या सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

बिलासपूर | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तबलिगी जमातच्या सदस्यांनी 1 मार्च 2020 पर्यंतच्या आपल्या प्रवासाची माहिती उघड करावी, असा आदेश छत्तीसगडमधील राजनंदगावचे जिल्हाधिकारी जे पी मौर्या यांनी दिला आहे. जर संबंधित व्यक्तीने कोणतीही माहिती लपवली तर त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असंही जे पी मौर्या यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांमधील अनेक जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे त्यांनी आपली 1 मार्च 2020 पर्यंतच्या प्रवासाची माहिती उघड करावी अशी विनंती केली आहे. तसंच जर कोणीही छत्तीसगडमध्ये किंवा बाहेर प्रवास केला असेल तर त्याचीही माहिती द्यावी, असं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटलं आहे.

तबलिगी जमातचा कार्यक्रम कोरोना व्हायरसचा फैलाव करणारं हॉटस्पॉट ठरलं आहे. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा येथे काही जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेश पत्रात सर्व धर्मियांना कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये असंही बजावलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

-राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

-“एखाद्या राज्यातून लॉकडाऊन हटवणं आणि एखाद्या राज्यात चालु ठेवणं योग्य नाही”

-संजय राऊतांची मोदींवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं; चंद्रकांत पाटलांकडून राऊतांचा समाचार

-“अर्थव्यवस्थेला पुन्हा रूळावर आणायचं असेल तर, आपल्याला काही धाडसी पावलं उचलावी लागतील”

-“पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रमुखावर कारवाई करा”