मुंबई | जगभरातून थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे जवळपास हजारोंच्या संख्येने जीव गमावला आहे. कोरोना विषाणूची धास्ती सामान्यांपासून अभिनेत्यांनपर्यंत सर्वांनाच आहे. चित्रपट, मालिका, वेब सीरीज, जाहीराती या सर्वांचं शूटींग रद्द करण्यात आलं आहे.
मराठी अभिनेता सुबोध भावे याने कोरोनासंबंधी नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
खूप घाबरायला होतं, अस्वस्थ होतं. आजूबाजूची परिस्थिती भीतीचं वातावरण निर्माण करते. अगदी तेव्हाच आशेचा एक किरण ही आपल्या आयुष्यात येतो. घाबरू नका, भिऊ नका, स्वच्छ रहा, सुरक्षित रहा. स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या, असं सुबोधने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सुबोध भावेने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सूर्याची किरणं पाहायला मिळत आहेत. एक आशेचा किरण नक्की आपल्या आयुष्यात येईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. देशात एकूण 3 तीन कोरोनाग्रस्तांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“मध्य प्रदेशात जसा राजकीय भुकंप झाला तसाच राजकीय भुकंप महाराष्ट्रात देखील होईल”
-मास्कवर शिवाजी महाराजांची प्रतिमा, मास्क न घेण्याचं शिवप्रेमींचं आवाहन
-कोरोनावर उपाय सुचवा आणि जिंका बक्षिस…; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन
-तुला मला का भेटायचं होतं?; राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीने घेतली पप्पी पाहा व्हिडीओ
-कोणत्याही शहराला लॉकडाऊन करणार नाही पण… मुखमंत्र्यांचं जनतेला आवाहन