“राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज कोणतीही वाढ नाही”

मुंबई | महाराष्ट्रासाठी आजचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला आहे. दररोज होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या वाढीला मागील 15 तासात ब्रेक लागला आहे. मागील 15 तासात राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नसल्याचं, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगितलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज कोणतीही वाढ नाही. सर्व 39 रुग्णांची तब्येत स्थिर आहे. आज कॅबिनेट बैठकही आहे. त्यातही कोरोनाच्या संबंधात चर्चा होईल. आपण अनेक खबरादारीचे उपाय केले असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे

‘सोशल डिस्टन्सिंग’ हा करण्यात आलेल्या उपाययोजनांचा गाभा आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात न येता अधिकाधिक अंतर कसं ठेवता येईल यावर सर्वांनी लक्ष द्यावं, असं आवाहनही राजेश टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. देसात एकूण 3 तीन कोरोनाग्रस्तांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अन् सुबोध भावेला दिसतोय यामधूनही आशेचा किरण

-“मध्य प्रदेशात जसा राजकीय भुकंप झाला तसाच राजकीय भुकंप महाराष्ट्रात देखील होईल”

-मास्कवर शिवाजी महाराजांची प्रतिमा, मास्क न घेण्याचं शिवप्रेमींचं आवाहन

-कोरोनावर उपाय सुचवा आणि जिंका बक्षिस…; नरेंद्र मोदींचं जनतेला आवाहन

-तुला मला का भेटायचं होतं?; राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीने घेतली पप्पी पाहा व्हिडीओ