ख्रिसमस पार्टी भोवणार! अर्जुन कपूरसह ‘या’ 3 जणांना कोरोनाची लागण

मुंबई | गत काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे. असं असताना आता बाॅलिवूडमधून एक खळबळ माजवणारी बातमी येत आहे.

नुकतंच करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता कपूर परिवाराला कोरोनानं घेरल्याची माहिती समोर येत आहे.

आघाडीचा बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर, अंशुल कपूर, रिया कपूर आणि करण बुलानी यांची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. परिणामी कोरोनानं कपूर परिवारातील सदस्य आजारी आहेत.

यासर्वांना सध्या घरीच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सध्या कोरोनाच्या रूग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत आहे. आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढू नये म्हणून सरकार सर्व प्रयत्न करत आहे.

बोनी कपूर यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. बोनी कपूर यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानं कपूर परिवाराला दिलासा मिळाला आहे. पण त्यांच्या कुटुंबावरील कोरोनाचं सावट अद्यापी कायम आहे.

अंशुलाचा 29 तारखेला म्हणजेच आज वाढदिवस आहे पण तीच्याकडून वाढदिवसाच्या कसल्याही पोस्ट पडल्या नाहीत. परिणामी तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं सध्या कोणाताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही.

ख्रिसमसच्या पार्टीमुळं हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात बाॅलिवूड सेलिब्रिटींना कोरोना झाल्यानं आता काळजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, ओमिक्राॅनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी सरकारनं आता नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बाॅलिवूड पार्ट्यांना बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

नितेश राणेंना अटक होणार?; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका

‘…हा धोक्याचा अलार्म आहे’; लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा

“तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, पत्रातले धमकीवजा शब्द पाहून मी…”

“1 कोटी दारू पिणाऱ्यांनी आम्हाला मत द्यावं, सत्ता आल्यास आम्ही…”