“ही तिसऱ्या लाटेची सुरूवात असू शकते पण…”, आदित्य ठाकरेंचा गंभीर इशारा

मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) समोर आलेला ओमिक्रॉन (B.1.1.529) व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन विषाणूमुळे तिसरी लाट येऊ शकते, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Minister Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. त्यातच आता राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aditya Thackeray) यांनी ओमिक्रॉन विषाणू आणि तिसऱ्या लाटेबाबत वक्तव्य केलं आहे.

राज्यात ओमिक्रॉन रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी पुढील वर्षी फेब्रुवारी काय आणि आता काय वाढणारी रूग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सुरूवात असू शकते. परंतु, पॅनिक होण्याची  काही गरज नाही.

विनाकारण घराबाहेर पडू नये. घाबरण्याची गरज नाही. ओमिक्रॉन गंभीर नसल्याचा सगळीकडे समज आहे. तशी निरीक्षण देखील दिसताहेत. मात्र, ते तसचं राहिल का? यावर संशोधन झालेलं नाही. त्यामुळे काळजी घेणं आवश्यक असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील कोरोना स्थितीवर देखील भाष्य केलं आहे. मुंबईमध्ये इमारती सील करण्याची कारवाई येऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

ट्रेस करत राहणं, टेस्ट करत राहणं, दहाहुन अधिक रूग्ण कोणत्याही इमारतीमध्ये सापडल्यास सदर इमारती सील करण्यात येताल, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

आत्ता आपल्याकडे 54 हजार बेड उपलब्ध आहेत. बाहेरून येणारे किंवा आपल्याकडचे पॉझिटिव्ह हे जास्तीत जास्त लक्षण नसलेले आहेत. तरीदेखील हलगर्जीपणा करणं  चुकीचं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच आदित्य ठाकरे यांनी शाळा (Schools) आणि कॉलेज (College) सुरूच राहणार का?, यावर देखील भाष्य केलं आहे. शाळा आणि कॉलेज याविषयी आपण ट्रीगर लावलेले आहेत. ते हिट झाल्यावर त्याविषयी निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जर गरज पडली तर पुढच्या आठवड्यात त्याविषयी निर्णय घेतला जाईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं  आहे. डबलिंग रेट वाढला आहे. परंतु, रूग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण देखील कमी अशल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ज्या वेगाने केसेस वाढत आहेत, मास्क लावण काळजी घेणं, दुसरा डोस घेण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

बाप-लेक अडचणीत! नितेश राणेंनंतर आता नारायण राणेंनाही पोलिसांची नोटीस

नितेश राणेंना अटक होणार?; न्यायालयाचा नितेश राणेंना झटका

‘…हा धोक्याचा अलार्म आहे’; लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 500 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा

“तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही, पत्रातले धमकीवजा शब्द पाहून मी…”