निर्मला सीतारामन यांनी सोनिया गांधींना हात जोडून केली विनंती, म्हणाल्या…

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग पाचव्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजची माहिती दिली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचं नाव येताच निर्मला सीतारामन भडकल्या.

मी सोनिया गांधी यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जास्त जबाबदारीने बोललं आणि वागलं पाहिजे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

मला विरोधी पक्षांना आवाहन करायचं आहे की स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केलं पाहिजे. आम्ही सर्व राज्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा करत असून लक्ष ठेवून आहोत, असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटाशी तोंड देत असलेल्या सर्वच राज्यांना केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जात असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे असं दिसतंय- नितेश राणे

-पृथ्वीराज बाबांना काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाण्यापासून कोण रोखतंय बघतेच- तृप्ती देसाई

-ग्रीन झोन असलेल्या बीडमध्ये कोरोनाचा शिरकाव; पाहा कोरोना कुठून कसा आला…

-कुणी 5 कोटी दिलेत, कुणी 500 कोटी… आम्ही आमचं आयुष्य देतोय; मुंबई पोलिसांचं भावूक ट्विट

-“खडसेंना बाजूला करण्यात यांचा डाव; राज्यातील भाजप नेत्यांमध्ये तेवढी ताकद आणि हिम्मत नाही”