लोकांना थोडासा दिलासा मिळावा म्हणून ‘हे’ करा, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई | मुंबई आणि पुण्यामध्ये अनेक वसाहती आणि परिसर कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर सील करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं सावट कायम आहे. लोकांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी सल्ला राज यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

राज ठाकरे यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रसार माध्यमं आणि लोकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. लोकांच्या मनातील करोनाची भीती दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना काही सूचना केल्या आहेत.

करोनातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे. त्याला देखील योग्य प्रसिद्धी दिली गेली, तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, रुग्ण ठणठणीत बरे होऊन बाहेर पडत आहेत याची आकडेवारी देणारं एक ‘न्यूज बुलेटिन’ आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारनं जारी करावं. माध्यमांनी देखील या मुद्द्याच गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवावं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या –

-“ही वेळ राजकारणाची नाही, निवडणुका लागल्यावर राजकारण करता येईल”

-“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना विनंती करतो, महाराष्ट्रात लष्कराच पाचारण करा”

-आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही- राहुल गांधी

-लॉकडाउन हे भारताने वापरलेलं सर्वात प्रभावी अस्त्र- डॉ. रमण गंगाखेडकर

-“सरपंच आणि पोलीस पाटलांना 25 लाखांचं विमा संरक्षण द्या”