बारामतीत ‘भिलवाडा पॅटर्न’ राबवा- अजित पवार

मुंबई | बारामतीत गुरुवारी एका भाजी विक्रेत्याचा करोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबातील दोघांनाही करोनाची लागण झाली आहे. यासोबत बारामतीमधील कोरोनाबाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा आदेश दिला आहे.

बारामतीमधील भाजी विक्रेत्याला करोनाची लागण झाली होती. या भाजी विक्रेत्याचं गुरुवारी उपचारादरम्यान निधन झालं. भाजी विक्रेत्याच्या मुलगा आणि सुनेलाही कोरोनाची लगाण झाली असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर प्रशासनाकडून कठोर पावलं उचलत पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.

कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी अजित पवार यांनी बारामतीत भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे  घरोघरी जाऊन सर्वच कुटुंबांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरातील लोकांची तीन वेळा तपासणी केली जाणार आहे. सर्वत्र नाकाबंदी असून कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी असणार नाही. कोणीही बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, भिलवाडा पॅटर्न म्हणजे राजस्थानमधील भिलवाडा या गावामध्ये  डॉक्टरला करोनाची लागण झाली होती. येथील रुग्णांची संख्या 27 वर पोहोचली होती. पण नंतर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेत शहराच्या सीमा सील केल्या. सर्व हॉटेल्स आणि खासगी रुग्णालये ताब्यात घेतली. प्रत्येक घरी जाऊन लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलीयाशिवाय लोकांनीही सामाजिक अंतर पाळण्यावर भर दिला. प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एकत्रित प्रयत्नामुळे भिलवाडा येथे करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.

महत्वाच्या बातम्या 

-कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट पगार; सरकारचा निर्णय

-दुसऱ्याचं रिजार्ज करा आणि मिळवा नफा; जिओ, एअरटेलची अनोखी ऑफर

-मी उद्धवजींवर टीका नाही करणार, वाटलं तर सूचना करेन – पंकजा मुंडे

-‘उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील’; पंकजा मुंडेंकडून ठाकरे सरकारच्या कामाचं कौतुक

-अजय देवगणच्या ट्विटला मुंबई पोलिसांचं खास अंदाजात उत्तर; म्हणाले…