कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट पगार; सरकारचा निर्णय

नवी दिल्ली | कोरोनावर मात करण्यासाठी आणि कोरोनाला पळवून लावण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेस आपल्या जीवाची बाजी लावून काम करत आहेत. त्यांच्याच प्रती महत्त्वाचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार देण्याचा निर्णय मनोहरलाल खट्टर सरकारने घेतला आहे.

खट्टर सरकारने याआधी कोरोनाग्रस्तांवर उपचार करत असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 50 लाखांपासून 10 लाखांपर्यंतच्या वैद्यकीय विमा सुरक्षेची घोषणा केली  आहे. आता डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार देण्याचा निर्णय घेऊन मनोहरलाल खट्टर सरकारने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हरयाणा सरकार दुप्पट पगार देणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख, राज्यातील काही प्रमुख डॉक्टर आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री खट्टर यांनी ही घोषणा केली.

दरम्यान, आपल्या जीवावर उदावर होऊन डॉक्टर तसंच त्यांचा संपूर्ण स्टाफ काम करत आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

-दुसऱ्याचं रिजार्ज करा आणि मिळवा नफा; जिओ, एअरटेलची अनोखी ऑफर

-मी उद्धवजींवर टीका नाही करणार, वाटलं तर सूचना करेन – पंकजा मुंडे

-‘उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील’; पंकजा मुंडेंकडून ठाकरे सरकारच्या कामाचं कौतुक

-अजय देवगणच्या ट्विटला मुंबई पोलिसांचं खास अंदाजात उत्तर; म्हणाले…

-गायिका कनिका कपूरची सहावी टेस्ट निगेटीव्ह; डिस्चार्जनंतर होम क्वारंटाईन