coronavirus update: राज्याला मोठा दिलासा! आज एकही मृत्यू नाही; कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबई | कोरोनाचं (coronavirus update) सावट राज्यात कमी होताना दिसतंय. त्यामुळे राज्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

रुग्णसंख्येत आणि मृत्यूच्या संख्येतही दिवसेंदिवस घट होत आहे. अशातच आजची राज्यातील दिलासादायक आकडेवारी समोर आलीये.

आज राज्यात 99 रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली नाही. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 77,23,468 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 180 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7,89,86,970 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

सध्या कोरोना आटोक्यात असल्यातं चित्र आहे. मात्र, येत्या काळात कोरोना रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी आतापासून काळजी घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

काँग्रेसला मोठा झटका?, ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

 दाद्या मारायलाय…! शंकरपाळ्यानंतर आता महाराष्ट्राला वेड लावणारं बारकाल्या पोरांचं भांडण व्हायरल

NCC उमेदवारांसाठी खुशखबर! पोलीस भरतीसाठी ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“कोण कोणासोबत झोपतो हे…”, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली

Health Tips For Summer: कडक उन्हाळ्यात ‘हे’ 7 पदार्थ नक्की खा… शरीराला आराम मिळेल