कोरोनाला संपवण्यासाठी रोहित पवारांनी केलं खास आवाहन, सुचवली नवी आयडिया!

पुणे | महाराष्ट्रावर कोरोना व्हायरस संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कोरोना व्हायरसविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही यात पुढाकार घेत नागरिकांना आवाहन केलं आहे.

वैद्यकीय सेवा, पोलीस, वैज्ञानिक यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी सोशल मीडिया फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअॅपवर आपला डीपी हा राष्ट्रध्वज ठेवण्याचं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करून नागरिकांना आवाहन केलं आहे.

आपल्याला प्रत्येकाला देशावर नितांत प्रेम आहे. पण आज देशापुढे कोरोना व्हायरसचं महासंकट उभं ठाकलं आहे. यातून देशाला बाहेर काढण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहे आणि आपण करत आहोत. असं रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आजही राज्यात 3 नवे रुग्ण आढळून आले आहे. पुण्यात 2 आणि बुलडाण्यात एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 338 वर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-धारावीत सफाई कर्मचाऱ्यालाच करोनाची लागण; आरोग्य विभागाचं टेंशन वाढलं

-“मरकजमधील व्यक्तींनी पुढे येऊन तपासणीसाठी सहकार्य करावं, महाराष्ट्रात कोणताही धार्मिक कार्यक्रम नको”

-कोरोनाच्या लढ्यात इंदोरीकर महाराजांची ‘लाखमोलाची’ मदत!

-“संजय राऊत म्हणजे शरद पवारांच्या घरचं खरूजलेलं कुत्रं”

-अशा लोकांची आता खैर नाही; अजित पवारांचा इशारा