#Corornaच्या पार्श्वभूमीवर महापौरांचं पुणेकरांना आवाहन

पुणे | जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे 5 रुग्ण आढळले. तेव्हापासून पुणेकरांमध्ये चांगलच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. खबरदारी म्हणून पुण्याचे महापौर मुलरीधर मोहोळ यांनी नागरिकांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सज्ज झाला आहे. अवघ्या चोवीस तासांच्या आताच विलगीकरणाचे 300 बेड्स सज्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 5 आहे. त्यांच्यावर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृती स्थीर आहे. पुणेकरांनी घाबरुन जाऊ नये. काळजी घ्या. आफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.

महापालिकेने पूर्ण क्षमतेने तयारी केलेली असून यासाठी सर्व पातळ्यांवर सर्वच घटकांचे सहकार्य घेतले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची जबाबदारीने काळजी घ्यायला हवी, असं आवाहन मुरलीधर मोहोळांनी केलं आहे.

कोरोनाग्रस्त रुग्ण ज्या भागात राहतात, ज्या भागात त्यांचा वावर होता, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जातोय. कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

“कर्नाटक, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रातही राजकीय भूकंप”

#Corona पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5; आरोग्यमंत्र्यांची माहिती

कोरोनाच्या भीतीने आईचा जीव कासावीस; मुलाला केलेला कॉल व्हायरल…

“काका जरा जपून महाराष्ट्रातही धक्का बसायचा”

“मला दर 10 वर्षांनी बाप बदलण्याची गरज नाही”